संक्षिप्त व्यक्ति-चरित्र मालिका

स्वामी विवेकानंदांना भेटलेल्या व्यक्ति

भगिनी निवेदिता

मराठी ध्वनिमुद्रण ऐकण्यासाठी वरील 'प्ले' बटण दाबा

शब्दांकन: मोहिनीराज भावे

वाचन: मोहिनीराज भावे

“The world is in need of those whose life is one burning love – self-less. That love will make every word tell like a thunder-bolt. Awake, awake, great souls! The world is burning in misery. Can you sleep?”

“जगाला अशा लोकांची गरज आहे ज्यांचं आयुष्य एक निस्पृह, ज्वलंत प्रेम आहे. हे प्रेम बोललेल्या प्रत्येक  शब्दाला सळसळणाऱ्या विजेमध्ये रुपांतरीत करेल. हे महान  आत्म्यांनो उठा जागे व्हा!  जग दुःखात  होरपळतंय  तुम्ही झोपू कसे शकता?”

स्वामी विवेकानंदांच्या या आवाहनाला अनेक तरूणांनी प्रतिसाद दिला. त्यातीलंच एक तरुण महिला म्हणजे भगिनी निवेदिता. तिचं खरं नाव मार्गरेट एलिझाबेथ नोबल. २८ ऑक्टोबर १८६७ यावर्षी आयर्लंड मधील डंगॅनॉन (Dungannon) या गावी तिचा जन्म झाला. तिचे बालपण आणि युवा अवस्था तिने आयर्लंडमध्ये घालवले. तिच्या वडिलांकडून म्हणजे सॅम्युअल रिचमंड नोबल यांच्याकडून ती असे शिकली की “मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा.”

हॅलिफॅक्स कॉलेजमधून मार्गरेटचे शिक्षण झाले जिथे ती फिजिक्स, आर्ट्स, म्युझिक आणि साहित्य हे विषय शिकली. 1884 मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी तिने शिक्षकी पेशा स्वीकारला. धार्मिक पार्श्वभूमी मुळे तरुणपणीच मार्गरेट ख्रिश्चन धर्माचा अभ्यास करत होती.  लहानपणा-पासूनच तिला धार्मिक शिकवणुकीचा आदर होता. ही शिकवण  हे म्हणजे संपूर्ण सत्य नव्हे असे तिला वाटू लागले होते. जेव्हा तिच्या या शंका अधिकाधिक तीव्र होऊ लागल्या तेव्हा ख्रिश्चन धर्मामधील तिचा विश्वास डळमळू लागला. जवळ जवळ सात वर्ष  मार्गरेटने आपले मन स्थिर करण्याचा प्रयत्न केला पण यामुळे ती अधिक दुःखी राहू लागली. सत्याचा शोध तिला नॅचरल सायन्स या विषयाचा अभ्यास करण्यास प्रवृत्त करू लागला आणि तिने गौतम बुद्धांबद्दल अभ्यास करण्यास सुरुवात केली.

 नोव्हेंबर १८९५ मध्ये ती पहिल्यांदा स्वामी विवेकानंद यांना भेटली. जे अमेरिके वरून लंडनला आले होते आणि आणि तिथेच तीन महिने राहिले. एका शांत दुपारी स्वामी विवेकानंद वेदांत या विषयावर बोलत होते. अध्यात्म विषयाची आवड आणि उत्कंठा यामुळे मार्गरेटसुद्धा या चर्चेला उपस्थित राहिली. खरतर तिला हे माहीतच नव्हते कि ती संध्याकाळ तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकेल.

स्वामीजींशी पहिल्या भेटीविषयी मार्गरेटने असे लिहिले आहे की,
“जर त्यावेळेस ते लंडनला आले नसते तर आयुष्य म्हणजे एक डोके नसलेले स्वप्न राहिले असते. मला नेहमी हे माहीत होते कि मी कशाचीतरी वाट पाहत आहे आणि मी नेहमीच असे म्हटले कि येईल ती वेळ येईल. आणि ती आली. पण जर मला आयुष्य अधिक चांगल्या तऱ्हेने माहीत असते तर मला शंका आहे की मी ती वेळ ओळखू शकले असते का? मी खूप भाग्यशाली आहे कि मला खूपच कमी माहिती होती आणि मी त्या छळापासून वाचले. माझ्या आतमध्ये नेहमी एक ज्वलंत आवाज होता पण बोलण्यासाठी काहीच नव्हते. कितीतरी वेळा मी हातात पेन घेऊन बसले पण लिहिण्या-बोलण्यासारखे काहीच नव्हते. पण आता मात्र त्याला अंत नाही. बाणाला त्याचे धनुष्य सापडले आहे. पण..पण जर ते आले नसते, हिमालया मध्येच ध्यान लावून बसले असते तर?…. तर मी इथे कधीच नसते.”

मार्गरेटने गौतम बुद्धांच्या शिकवणुकी मध्ये रस घेण्यास सुरुवात केली. त्याच बरोबर स्वामी विवेकानंद यांच्या बरोबरील चर्चा शांतता आणि परमार्थ या दोन्हीचा एक पर्यायी स्त्रोत होतेस्वामी विवेकानंद यांची तत्वे आणि शिकवणूक यांनी ती प्रभावित झाली. ज्यामुळे तिच्या मध्ये अनेक बदल दिसून येऊ लागले. स्वामीजींच्या आवाहना प्रमाणे मार्गरेट तिचे मित्रनातेवाईक एवढेच काय तर आईला सुद्धा मागे सोडून भारतात आली. मोंबासा हे जहाज मार्गरेटला घेऊन २८ जानेवारी १८९८ मध्ये हे कलकत्ता  येथे पोचले.

भारतात आल्यानंतर काही दिवसातच  मार्गरेट १७ मार्च १८९८ या दिवशी माता शारदा देवी यांना भेटली.  ज्यांनी भाषासंस्कार इत्यादी सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन तिच्याशी संवाद साधला आणि तिलाखूकी  या नावाने संबोधले म्हणजे  बंगालीमध्ये लहान मुलगी२५ मार्च १८९८ या दिवशी नीलांबर मुखर्जी यांच्या बागेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी मार्गरेटला आजीवन ब्रह्मचर्यची  दीक्षा दिली आणि आणि तिला नाव दिलेनिवेदिताम्हणजे समर्पित अशी. 

त्यानंतर स्वामी विवेकानंद, Josephine Mcleod आणि सारा बुल यांच्याबरोबर निवेदिता भारतातील अनेक ठिकाणी फिरल्या.  यामुळे त्या भारतातील अनेकांना भेटू शकल्या येथील जीवन, संस्कृती आणि इतिहास जवळून पाहू शकल्या१३ नोव्हेंबर १८९८ ला काली पूजनाच्या दिवशी कलकत्ता येथील बाग बाजार भागामध्ये भगिनी निवेदिता यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली. या शाळेचे उद्घाटन माता शारदा देवी यांच्या हस्ते झाले. या शाळेसाठी निधी गोळा करणे हे काही सोपे काम नव्हते. भगिनी निवेदिता वेगवेगळे लेख लिहून तसेच व्याख्याने देऊन यासाठी निधी गोळा करत. 

१८९९ मध्ये कलकत्त्यामध्ये प्लेगची साथ आली. भगिनी निवेदिता यांना लोकांचे हाल बघवेना. त्यांनी स्वतः स्वच्छता करायला सुरुवात केली. त्यांच्यामुळे अनेक तरुण या स्वच्छता मोहिमेचा भाग झाले. प्लेगमुळे बाधित रुग्णांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी त्यांनी इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये आवाहने केली ज्यामुळे निधी गोळा करण्यास मदत झाली. याच काळामध्ये अनेक बंगाली मान्यवरां बरोबर त्यांचा संबंध दृढ झाला. ज्यामध्ये रवींद्रनाथ टागोर, जगदीश चंद्र बोस, आबाला बोस, अबिंद्रनाथ टागोर यांसारखे लोक होते. त्यांच्याबरोबर होणारे संभाषण तसेच स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी तरूण-तरूणी यांच्या बरोबरील संभाषण यामुळे त्या भारतीय स्वातंत्र्याच्या कार्यामध्ये सहभागी झाल्या.

भारतीय इतिहास संस्कृती शास्त्र या विषयांमध्ये त्यांना विशेष रुची होती. इसका याचा प्रसार करण्यासाठी त्यांनी जगदीश चंद्र बोस यांना आर्थिक सहाय्य सुद्धा केले. भगिनी निवेदिता यांनी अनेक तरुणतरुणींना प्रेरणा दिली त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने देऊन भारतीय अस्मिता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संदेश दिला. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली ज्यामध्ये काही स्वामी विवेकानंद यांच्याबरोबर व्यतीत केलेल्या काळाची होती किंवा चर्चांची होती तर काही ही हिंदू संस्कृती, बुद्ध संस्कृती, भारतीय इतिहास, धर्म अशा विषयांवरची होती एक प्रकारे त्या खऱ्या अर्थाने भारतीय होत्यावयाच्या ४४ व्या वर्षी, १३ ऑक्टोबर १९११ रोजी दार्जिलिंग येथे त्यांचे देहावसान झाले. 

Disclaimer:
The materials presented on this website such as text, audio, video and other, are based on the compilation of information, gathered from various sources. The sources include books, ebooks, internet site, etc. We neigher claim any copyright on the perticulars of the information, nor can take any responsibily for the correctness of it. However, we are taking our best efforts, to present the information as accurate as possible. If you find any incorrectness in it, kindly do let us know about it. We will try our best to make all the necessory modifications.