Videos

श्रीरामकृष्ण वचनामृत वाचन

नमस्कार! चित्रामृत प्रस्तुत, ‘श्रीरामकृष्ण वचनामृत वाचन’ ही मालिका आपल्यापूढे सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या मालिकेत आम्ही आपल्या सर्वांच्या लाडक्या ‘वचनामृत’ स्मृती-ग्रंथाचं वाचन सादर करत आहोत.

उपनिषदांमधील अत्युच्च ज्ञानाला प्रत्यक्ष आयुष्यात कसं उतरवता येईल हे आपल्या-सारख्या सामान्य मनुष्यांना शिकवण्यासाठीच भगवंत वारंवार मनुष्यरुपात अवतरीत होत असतात. श्रीरामकृष्णांच जीवन म्हणजे साक्षात ही उपनिषदेच. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला भगवंताच्या अनंत पैलूचं दर्शन होउ शकतं. ‘वचनामृत’ सारखे ग्रंथ आपल्याला श्रीरामकृष्णांच्या अभूतपूर्व जीवनातील घडामोडींची अगदी जवळून ओळख घडवून आणतात. या ग्रंथाबद्दल खरं म्हणजे जितकं बोलावं तितकं कमीच.

महेंद्रनाथ गुप्त’ यांनी श्रीरामकृष्णांशी झालेल्या भेटीना आपल्या दैनंदिनीत शब्दबद्ध केलं. ‘श्री म’ नावानी त्यांनी लिहिलेला मुळ बंगाली ग्रंथ म्हणजे, ‘श्रीश्रीरामकृष्णकथामृत’. पुढे कालांतराने त्याचे विविध भाषांमधे अनुवाद झाले. स्वामी शिवतत्वानंद यांनी मुळ बंगालीवरून केलेला मराठी अनुवाद म्हणजेच ‘श्रीरामकृष्ण वचनामृत’. हा मराठी अनुवाद श्रीरामकृष्ण मठ नागपूर यांच्यातर्फे प्रकाशित झाला आहे. या मालिकेतील वाचनासाठी आम्ही वापरत असलेली आवृत्ती तेरावी असून ती सन २००६ मधे प्रकाशित झाली आहे.

हे वाचन मोहिनीराज भावे यांच्या आवाजात सादर होत आहे. ऐकताना सोपं जावं म्हणून काही किरकोळ बदल केले आहेत. आम्हाला खात्री आहे की हा उपक्रम आपल्या सर्वांना खूप आवडेल. आपण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.

चला तर मग, या मधूर आणि अद्भूत स्मृतीग्रंथाचा आस्वाद घेउया.

श्रीरामकृष्ण वचनामृत

संपूर्ण प्ले-लिस्ट साठी वरील लिंक जरूर पाहा!  दर आठवड्याला नवीन अध्यायांची भर…

Disclaimer:
The materials presented on this website such as text, audio, video and other, are based on the compilation of information, gathered from various sources. The sources include books, ebooks, internet site, etc. We neigher claim any copyright on the perticulars of the information, nor can take any responsibily for the correctness of it. However, we are taking our best efforts, to present the information as accurate as possible. If you find any incorrectness in it, kindly do let us know about it. We will try our best to make all the necessory modifications.